नवी दिल्ली – आम आदमी पक्षाने (AAP) आता दिल्लीचे नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना ( Deputy Governor of Delhi V. K. Saxena) यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. खादी ग्रामोद्याग आयोगाचे अध्यक्ष असताना सक्सेना यांनी 2016 साली नोटबंदीच्या काळात चौदाशे कोटी रुपयांच्या नोटा बदलून घेतल्याचा आरोप आहे.
या आरोपांची चौकशी करावी, या मागणीसाठी आम आदमी पक्षाचे आमदार आज रात्रभर विधानभवनाच्या आवारातच ठिय्या देऊन मुक्काम करणार आहेत. आम आदमी पक्षाचे आमदार दुर्गेश पाठक यांनी त्यांच्यावर हा आरोप केला आहे. राज्यपालांच्या या चौदाशे कोटी रुपयांच्या घोटाळ्याची त्वरित चौकशी करावी आणि या पैशाचे पुढे काय झाले याची माहिती लोकांपुढे यावी, अशी त्यांची मागणी आहे.
सध्या राज्यपाल सक्सेना यांनी आम आदमी पक्षाच्या प्रत्येक फायलींची अडवणूक करून सरकारला अडचणी निर्माण करण्याचे तंत्र अवलंबले आहे. त्यामुळे आम आदमी पक्षाने आता त्यांच्या विरोधात ही आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यावर राज्यपालांकडून अजून कोणतेही उत्तर आलेले नाही. (Deputy Governor of Delhi V. K. Saxena exchanged notes worth Rs 1400 crore during demonetisation – AAP)