कोलकाता – प. बंगालमधील शिक्षक घोटाळा प्रकरणातील आरोपी व माजी मंत्री पार्थ चॅटर्जी यांच्यावर आज एका माहिलेने बूट फेकला. त्यांनी गरिबांचे पैसे खाल्ले आहेत. बूट त्यांच्या डोक्यात लागली असती तर मला अधिक आनंद झाला असता असे संबंधित महिलेने म्हटले आहे.
चॅटर्जी यांना तपासणीसाठी आणण्यात आले होते. त्यावेळी या महिलेने त्यांच्यावर बूट फेकला. दरम्यान, ही महिला भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ता असल्याचा दावा काही जणांनी केला आहे, तर काहींनी तिला दुर्गामाता म्हटले आहे. आपण त्यांना मारण्यासाठीच बूट घेऊन आलो होतो, असे संबंधित महिलेने म्हटले आहे.