एलीयन समुद्रात खोलवर वास्तव्यास असल्याचा दावा
वॉशिंग्टन : एलियन्स म्हणजे परग्रहवासी पृथ्वीवर खरोखरच आहेत का आणि असतील तर ते कुठे आहेत याबाबत गेल्या काही दिवसात चर्चा सुरू असतानाच आता जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ आइन्स्टाइन यांच्या एका महिला सहकाऱ्याने 1947 मध्ये एका एलियनचा इंटरव्ह्यू घेतल्याची माहिती उघड झाली आहे.
ऍना विटी नावाच्या एका विज्ञान लेखिकेने यूएफ फंडामेंटल ट्रूथ नावाचे पुस्तक प्रसिद्ध केले असून त्यामध्ये तिने आईन्स्टाईनची महिला सहकारी डॉ शर्लि राईट यांचा हवाला दिला आहे. 1947 मध्ये डॉक्टर राइट यांनी एका एलीयनचा इंटरव्यू घेतल्याची माहिती या पुस्तकात लेखिका ऍना यांनी दिली आहे.
ज्या एलियनचा इंटरव्यू डॉक्टर शरली राईट यांनी घेतला होता त्या एलियनने डॉक्टर राईट यांना एक प्रतिप्रश्न केला होता त्यामध्ये त्याने माणसाने समुद्रामध्ये किती खोल संशोधन केले आहे,असा प्रश्न विचारला होता. त्यानंतरच एलियन असतील तर ते समुद्रात खोल कुठेतरी लपून बसले असावेत अशी शक्यता समोर आली होती.
ऍना विटी यांनी आपल्या पुस्तकातही एलियन्स कित्येक वर्षे पृथ्वीवर राहात असून ते सामान्य माणसाप्रमाणेच आहेत आणि एलियन समुद्रात कोठेतरी खोल पाण्यात किंवा गुहेत लपून बसले असावेत असेही या पुस्तकात म्हटले आहे.