टेलिव्हिजनवरील प्रसिद्ध अभिनेत्री आणि “बिग बॉस 4’ची विजेती श्वेता तिवारीची मुलगी पलक तिवारी सोशल मीडियावर खूप ऍक्टिव्ह असते. ती सतत नवीन फोटोशूट्स करून चर्चेत असते.
View this post on Instagram
पलक तिवारीने पुन्हा एकदा आपले लेटेस्ट फोटोशूट शेअर केले आहे. यात पलक तिवारी अत्यंत हॉट स्टाईलमध्ये दिसत आहे. यावर चाहत्यांनी अनेक कॉमेंटस् करत तिच्या फोटोवर लाईक्सचा वर्षाव केला आहे.
View this post on Instagram
पलकचे फोटो श्वेता तिवारीनेही तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. या फोटोंना काही तासांतच हजारो व्यूज मिळाले आहे. पलक तिवारी सोशल मीडियावर 4 लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. तिचे कोणतेही फोटो किंवा व्हिडिओ काही क्षणातच व्हायरल होतात.
View this post on Instagram
साडीचा पल्लू खांद्यावरून खाली उतरवून पलकने एकापेक्षा एक किलर पोज दिले आहे. या फोटोंमध्ये पलक तिवारीने तिचे केस मोकळे ठेवले आहे. तसेच हलक्या मेक-अपसह कानात लहान झुमके घातले आहे.
View this post on Instagram
दरम्यान, पलक ही श्वेता तिवारीचा पहिला पती राजा चौधरी यांची मुलगी आहे. यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केले. रेयांश हा श्वेता आणि अभिनव यांचा मुलगा आहे.
View this post on Instagram
पलक तिवारी लवकरच ‘रोजी’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याशिवाय पलकचा ‘द केफ्रॉन चॅप्टर’ नावाचा आणखी एक चित्रपट आहे. या चित्रपटात पलकशिवाय अरबाज खान आणि तनिषा मुखर्जी मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रंजन मिश्रा करत आहेत.