वॉशिंग्टन – अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असणारी नासा नेहमीच चंद्रावर घडणाऱ्या घडामोडींकडे लक्ष ठेवून असते नुकत्याच नासाला जी चंद्रावरील छायाचित्रे प्राप्त झाली आहे त्याबद्दल एक धक्कादायक बाब समोर आली आहे नासाला मिळालेल्या छायाचित्र नुसार चंद्रावर एक रहस्यमय रॉकेट आदळले असून त्यामुळे दोन मोठे खड्डे तयार झाले आहेत.
नासाच्या लुनर ऑर्बिटरने चंद्राच्या पृष्ठभागावरील छायाचित्रे खेचली असून त्यामध्ये हे दोन खड्डे तयार झालेले दिसत आहेत दोन्ही खड्डे एकमेकांच्या शेजारीच असून त्यामुळेच शास्त्रज्ञ हैराण झाले आहेत आजपर्यंत चंद्राच्या पृष्ठभागावर अशा प्रकारचे खड्डे दिसत नव्हते पण एखाद्या रहस्यमय रॉकेटमुळेच अशा प्रकारचे खड्डे तयार झाले असावेत असा शास्त्रज्ञांचा अंदाज आहे ज्या रॉकेटचा उपयोग संपला आहे असे रॉकेट अनेकदा चंद्रावर आदळत असतात पण त्या रॉकेट मध्ये इंधन खूपच कमी असल्याने मोठ्या प्रमाणात खड्डे तयार होत नाहीत.
पण जेव्हा खूप इंधन असणारे एखादे रॉकेट चंद्रावर आदळते तेव्हा अशा प्रकारचे मोठे खड्डे तयार होऊ शकतात असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे अमेरिकेने चंद्राच्या दिशेने अवकाशात जी रॉकेट सोडली होती त्यापैकी अनेक रॉकेट आत्तापर्यंत चंद्रावर आदळली आहेत पण तेव्हा कधीच अशा प्रकारचे खड्डे तयार झाले नव्हते त्यामुळेच जे रॉकेट पडल्यामुळे असे मोठे खड्डे तयार झाले आहेत ते रॉकेट चीनचे असावे अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.