प्रकाश झा दिग्दर्शित आश्रम 3 या वेबसिरीजला सध्या प्रेक्षकांची जोरदार पसंती मिळत आहे. ही मालिका ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज झाली आहे. या मालिकेत बॉबी देओल आणि ईशा गुप्ता यांच्यात एक लव्ह मेकिंग सीन चित्रित करण्यात आला आहे. हा सिन रिलीज होताच ईशा गुप्ताच्या बोल्ड अंदाजाने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत. अशातच आता ईशाने एका मुलाखतीमध्ये बॉबीसोबत हा लव्ह मेकिंग सीन चित्रित करतानाचा आपला अनुभव शेअर केला आहे.
ईशाने बॉबीसोबतचा आपला अनुभव सांगताना त्याचे तोंड भरून कौतुक केले. बॉबी देओल हा खूपच प्रेमळ माणूस असून तो सर्वांशी आदराने बोलतो. आश्रममध्ये बॉबीसोबत आपला जो पहिला सीन आहे तोच सीन प्रत्यक्षात देखील बॉबीसोबतचा पहिला शूट होता असं ईशाने सांगितलं. त्या सीन नंतर आम्ही एकमेकांना हाय बाय केल्याची आठवणही तिने सांगितली.
आश्रम 3 मध्ये बॉबी व ईशा यांचे एक इंटिमेट सॉंग देखील चित्रित करण्यात आले आहे. ईशाने, हे गाणे चित्रित करताना बॉबीला मला पकडायचे होते. मात्र त्याला मी पडेल अशी भीती वाटत होती. तेव्हा मी त्याला तुम्ही पकडा मी नाही पडणार असे सांगितले. असा अनुभव देखील शेअर केला. बॉबी सारखा को-ऍक्टर असल्यास लव्ह मेकिंग सीन सारखे अवघड सीन चित्रित करणं सोपं जातं असं ईशा म्हणाली.
लव्ह मेकिंग सीन चित्रित करत असताना अनेकदा अभिनेते त्यांची मर्यादा ओलांडतात. आपल्या सोबत झालेला असाच एक प्रकार ईशाने कोणाचेही नाव न घेता सांगितला. एका अभिनेत्याने लव्ह मेकिंग सीन शूट करताना आपली कुर्ती पकडली, वास्तवात तसं शूट करायचंच नव्हतं. त्यावेळीच आपण यापुढे त्या अभिनेत्यासह काम करायचे नाही असा निर्णय घेतल्याचेही ईशाने सांगितले.