मुंबई : भाजपचे किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यातील वाद काही नवीन नाही. एकमेकांनी अनेकदा एकमेकांवर टीका टिप्पणी केली आहे. आता शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी शौचालय घोटाळ्याप्रकरणी किरीट सोमय्या आणि मेधा सोमय्या यांच्यावर आरोप केले होते त्यावरून सोमय्या यांनी राऊत यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा केला होता. त्यानंतर आता संजय राऊत यांना कोर्टाकडून नोटीस पाठवण्यात आली आहे. १०० कोटींच्या शौचालय घोटाळ्यांच्या आरोपाखाली छळ आणि बदनामी केल्याचा आरोप राऊत यांच्यावर लावण्यात आला आहे.
Prof Dr Medha Kirit Somaiya will file Criminal Defamation Suit/Complaint at Sewri Court Mumbai on 18 May against Shivsena Sanjay Raut for harrasment and defamation ( IPC 499, 500) in the name of ₹100 Crore Toilet Scam
Defamation Notice was given, Complaint was filled earlier pic.twitter.com/e6uwoDLEFD
— Kirit Somaiya ( Modi ka Pariwar) (@KiritSomaiya) May 16, 2022
शौचालय घोटाळ्याचा आरोप करण्यात आल्यानंतर किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांनी स्वतः मुलूंडच्या नवघर पोलीस ठाण्यात अब्रुनुकसानीची तक्रार दाखल केली होती. मात्र त्यावर FIR दाखल करण्यात आला नव्हता.
नेमके काय आहे प्रकरण
मीरा भाईंदर मध्ये १५९ शौचालये बांधण्यात आली. त्यापैकी यातील 16 शौचालये बांधण्याचे काम किरीट सोमय्या यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला देण्यात आले होते. या प्रकरणी खोटी कागदपत्र देऊन मीरा भाईंदर पालिकेच्या अधिकाऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप शिवसेना आमदारांनी केला होता. प्रताप सरनाईक यांच्याकडून हा आरोप करण्यात आलेला होता. या प्रकरणातून साडेतीन कोटींहून अधिकची बिले घेण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला होता. प्रताप सरनाईक यांनी याबाबत विधान सभेमध्ये देखील प्रश्न उपस्थित केला होता.