बॉलीवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनने आपल्या सौंदर्याने चाहत्यांची मने जिंकली आहे. चाहते तिच्या स्टाईलची जोरदार प्रशंसा करत असतात, परंतु आजकाल सोशल मीडियावरील युजर्सला अभिनेत्रीची शैली आणि मेकअप आवडत नसल्याचे दिसून येत नाहीये. त्यामुळेच सोशलवर ऐश्वर्याची युजर्स स्तुती करण्याऐवजी माजी जागतिक सौंदर्यवतींना फॅशन स्टायलिस्ट बदलण्याचा सल्ला दिला जात आहे. अनेक चाहत्यांना प्रश्न पडतो की तुमच्या ड्रेसिंग सेन्सला काय झाले?
मुंबईत डॉक्टर्स कॉन्फरन्समध्ये ऐश्वर्या राय सहभागी झाली. यावेळी ऐश्वर्याने व्हाइट कलरच्या फ्लॉवर प्रिंटेड लाँग ओव्हरकोट प्रकारच्या ड्रेस कॅरी केला होता. तिने केस कुरवाळले होते आणि लाल लिपस्टिक लावली होती. या वेळी स्टेजवर पोहोचलेल्या ऐश्वर्याने हसत हसत सर्वांचे स्वागत केले, सॅल्युट केले पण तिची स्टाइल चाहत्यांना आवडली नाही.
ऐश्वर्या रायची मेकअप ड्रेसिंग
ऐश्वर्याच्या मेकअप आणि ड्रेसिंग स्टाइलने पाहुन चाहते निराशा झाले. सोशल मीडिया तिच्या या स्टाईलची खिल्ली उडवाली जात आहे. ऐश्वर्याची स्टाईल पाहुन चाहते तिला स्टायलिस्ट बदलन्याचा सल्ला देत आहेत, सोशलवर एक युजर्सने विचारले आहे की, ‘तुझ्या ड्रेसिंग सेन्सला काय झाले आहे?’ तर दुसऱ्याने विचारले आहे.. plz ..स्टायलिस्ट बदला’ असे लिहिले, तर एक युजर्सने लिहिले आहे की, ‘प्लीज लाल लिपस्टिक लावू नका’ असा सल्ला दिला. तिच्या या लूकवरून सोशलवर संमिश्र प्रतिक्रिया येत आहे.
ऐश्वर्या रायसोबत असे काही पहिल्यांदा घडत आहे असे नाही. अलीकडे कान्स फिल्म फेस्टिव्हल 2022 मध्येही त्याचा गेटअप आणि लूक चाहत्यांना आवडला नाही आणि त्यांना ट्रोल करण्यात आले. फेस्टिव्हलदरम्यान तिच्या मेकअप आणि स्टाइलबद्दलही विविध कमेंट करण्यात आल्या.