मुंबई – अभिनेत्री नुसरत भरुचा एका वेगळ्याच कारणाने नेटकऱ्यांच्या रडारावर आली आहे. बॉलिवूड अभिनेत्री नुसरत तिच्या आगामी चित्रपटासाठी ट्रोल होत आहे. अभिनेत्रीचा जनहित में जारी (Janhit Mein Jaari) हा चित्रपट येत आहे. हा चित्रपट कंडोमबद्दल लोकांना जागरूक करतो. नुसरत भरुचा या चित्रपटात सेल्सगर्ल बनली आहे. जे कंडोम विकते आणि लोकांना त्याबद्दल जागरूक करण्याचे काम करते. या चित्रपटाचा विषय बोल्ड आहे पण मजेशीर आहे.
नुसरतचा हा चित्रपट 10 जूनला सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. त्याचा ट्रेलर लवकरच रिलीज होणार आहे, याआधी सिनेमाचे पोस्टर आणि टीझर रिलीज करण्यात आला आहे. पोस्टर-टीझर रिलीज झाल्यापासून नेटकरी मात्र सक्रिय झाले आहेत. कंडोमच्या जाहिरातीमुळे नुसरत भरुचाला चांगलेच ट्रोल करण्यात आले होते. नेटकऱ्यांनी अभिनेत्रीच्या पोस्टरवर अश्लील कंमेंट्स केल्या ज्यामुळे ती शरमींदा झाली. दरम्यान नेटकऱ्यांना धडा शिकविण्यासाठी नुसरतने सुद्धा
ट्रोल करणाऱ्यांना चोख प्रत्युत्तर देत, सार्वजनिक हितासाठी सर्वात वाईट आणि अश्लील टिप्पण्यांचे स्क्रीनशॉट जारी केले.
View this post on Instagram
हे स्क्रीनशॉट्स शेअर करताना नुसरत म्हणाली, हीच विचारसरणी बदलायची आहे. मी तेच म्हणतेय. हरकत नाही, तुम्ही ट्रोल करा, मी आवाज उठवते. नुसरतने शेअर केलेल्या चित्रपटाच्या पोस्टरवर लोक अश्लील कमेंट करत आहेत.कोणी चित्रपटाला डी ग्रेड म्हणत आहे तर काही जण म्हणतात बॉलीवूड हे मेडिकल स्टोअर झाले आहे. युजर्सचे असेही म्हणणे आहे की चित्रपटाची कथा खरी नाही कारण कोणतीही मुलगी बाजारात जाऊन असे कंडोम विकत नाही. मात्र, चित्रपटाचे कौतुक करणारे असे लोकही पाहायला मिळाले.