हडपसर – पराभवाने खचून न जाता पाच वर्ष नितीन होले व शिल्पा होले या दाम्पत्याने जनतेची सेवा सुरूच ठेवली आहे. त्यांच्या कामाची पावती जनता येत्या मनपा निवडणुकीत त्यांना विजयश्री देऊन करेल , असा विश्वास भाजपा हडपसर विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष संदीप दळवी यांनी व्यक्त केला.
सातववाडी येथे भाजप ओबीसी मोर्चा पुणे शहर सरचिटणीस नितीनतात्या होले यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताहाचे आयोजन आत्मप्रभा फाउंडेशन व मित्रपरिवाराकडून करण्यात आले आहे. भारतीय डाक विभागाच्या सहकार्याने सातववाडीमध्ये आधारकार्ड आपल्या दारी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दळवी हे बोलत होते.
यावेळी नगरसेविका उज्वला जंगले, शहर भाजप उपाध्यक्ष भूषण तुपे, शहर भारतीय जनता पार्टी सरचिटणीस संदीप लोणकर ,जनसेवा बँकेचे संचालक रवी तुपे,माजी विधानसभा अध्यक्ष सुभाष जंगले,हडपसर विधानसभा संघटनमंत्री गणेश घुले,भाजप युवा मोर्चा शहर उपाध्यक्ष प्रमोद सातव, सविता हिंगणे, आकाश डांगमाळी,युवराज मोहरे, आत्मप्रभा फाउंडेशनच्या शिल्पा होले,गणेश सोरटे,वामन पुजारी,मयूर कामठे,अनिकेत जाधव यांच्यासह नागरिक,महिला, युवा कार्यकर्ते उपस्थित होते.शिबिर यशस्वी होण्यासाठी योगेश गारडे, अक्षय टिळेकर,शाहरुख सय्यद,नितीन लोणकर,राज घोलप,साहिल रासकर,राहूल शेटे,ओंकार पाखरे, अनिकेत थोरात,निलेश राऊत, रुपेश गोडसे, उमेश हरिहर,माऊली सूर्यवंशी, सलमान सय्यद, भाऊ पांढरे, धनंजय नवले, अनिल शेवते, जीवन शेडगे, गणेश काळे, राजु कांबळे, सचिन लोणकर, सोन्या कामत यांच्यासह नितीन तात्या होले मित्रपरिवार व आत्मप्रभा फाउंडेशनच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.