मुंबई – मुंबई महानगरपालिकेतून खळबळजनक बातमी समोर आली आहे. महापालिकेच्या भाडे संकलकासह सहाय्यक कर्मचाऱ्यास तब्बल तीन लाख रुपयाची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडे आहे. दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून पुर्ववत करण्याकरीता संकलकाने लाचेची मागणी केली होती.
राजेंद्र नाईक भाडे संकलकांचे नाव असून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दोघांनाही अटक केली आहे. लोकसेवक क्र. 1 यांनी तक्रारदार यांना त्यांच्या पत्नीच्या घरासंदर्भातील अपीलाबाबत ऑर्डर बदलुन देणेकरीता व तक्रारदार यांच्या नावे असलेल्या दुकानाची नोंद कमर्शियल म्हणून पुर्ववत करण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे तीन लाख रुपयांची मागणी केली. त्यानंतर तक्रारदार यांनी या प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार दाखल केली. दरम्यान लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या विषयी चौकशी केली असता तक्रारदाराकडे तीन लाख रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.