मुंबई – कोकण रेल्वेने आपल्या संपूर्ण ब्रॉडगेज नेटवर्कचे विद्युतीकरण करून लोकांना वाहतुकीचे पर्यावरण-स्नेही, हरित आणि स्वच्छ साधन उपलब्ध करून दिले आहे.
कोकण रेल्वेच्या संपूर्ण 741 किलोमीटर मार्गाच्या विद्युतीकरणाची पायाभरणी नोव्हेंबर 2015 मध्ये करण्यात आली. या प्रकल्पाचा एकूण खर्च 1287 कोटी रुपये आहे. संपूर्ण कोकण रेल्वे मार्गाची सीआरएस तपासणी मार्च 2020 पासून सहा टप्प्यांमध्ये यशस्वीरित्या करण्यात आली.
कोकण रेल्वेचा कठीण भूभाग आणि कोविड -19 च्या साथीमुळे प्रतिकूल वातावरणात हा विद्युतीकरण प्रकल्प आव्हानात्मक होता. शिवाय कोकण प्रांतात पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे विद्युतीकरण मोहीम अखंड सुरू राहण्यासाठी अनेक ठिकाणी विशेष व्यवस्था करावी लागली होती.
इलेक्ट्रिक ट्रॅक्शनमुळे इंधन खर्चात लक्षणीय बचत, पश्चिम किनाऱ्यांवरील इलेक्ट्रिक ट्रॅक्शनवर वेगवान हालचाल, प्रदूषणमुक्त वाहतुकीचे साधन आणि एचएसडी तेलावरील कमी अवलंबत्व हे फायदे आहेत.
कोकण रेल्वे हा भारतीय रेल्वेच्या सर्वदूर पसरलेल्या जाळ्यातील सर्वात मोठ्या रेल्वे मार्गांपैकी एक असल्यामुळे विद्युतीकरण केलेल्या नवीन कोकण रेल्वे मार्गावर टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक ट्रॅक्शनसह गाडया चालवल्या जातील. ‘मिशन 100% विद्युतीकरण – निव्वळ शून्य कार्बन उत्सर्जनाकडे वाटचाल’ उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भारतीय रेल्वे मिशन मोडवर काम करत आहे.