पश्चिम बंगाल सरकार राज्यातील सरकारी शाळांमध्ये नवीन ड्रेस कोड लागू करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बंगालमधील सर्व सरकारी, निमशासकीय आणि सरकारी अनुदानित शाळांमधील विद्यार्थ्यांचा पोशाख निळा आणि पांढरा असेल. नवीन ड्रेस कोडमध्ये बंगाल सरकारचा ‘बिस्वा बांगला’ लोगोही असेल. या लोगोची रचना खुद्द मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केली होती.
सरकारी आदेशानुसार, नवीन गणवेशाचा पुरवठा राज्याच्या एमएसएमई विभागाकडून केला जाईल. पूर्व प्राथमिक ते इयत्ता 8 वी पर्यंतच्या मुलांसाठी पांढरा शर्ट आणि नेव्ही ब्लू पॅंट आणि नेव्ही ब्लू फ्रॉक आणि सलवार कमीज हा ड्रेस कोड मुलींसाठी निश्चित करण्यात आला आहे.
यासोबतच प्रत्येक ड्रेसच्या खिशावर बिस्वा बांगलाचा लोगो असेल. राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय दप्तरांवरही बिस्वा बांगला हा लोगो असणार आहे. पूर्वप्राथमिक ते आठवीपर्यंतच्या मुलांना 1 हाफ पँट आणि 1 फुल शर्ट दिले जाईल, असे सरकारी आदेशात म्हटले आहे. पूर्व प्राथमिक ते इयत्ता दुसरी पर्यंतच्या मुलींना शर्ट आणि ट्यूनिक फ्रॉकचे दोन सेट मिळतील. इयत्ता तिसरी ते पाचवीपर्यंत शर्ट आणि स्कर्टचे दोन सेट दिले जातील. तर सहावी ते आठवीपर्यंत सलवार आणि कमीज दुपट्ट्याचे दोन सेट दिले जातील.