पॅरिस : रशियाकडून युक्रेनवर रात्रंदिवस बॉम्बहल्ले होत आहेत. या हल्ल्याने युक्रेनची जीवित आणि वित्त हानी मोठ्या प्रमाणात झालेली जगासमोर येत आहे. दरम्यान, रशियाच्या बॉम्बहल्ल्याने युक्रेन पूर्णपणे हादरून गेले आहे. त्यातच युक्रेनच्या दक्षिण-पूर्वेकडील शहर मारियुपोलमध्ये रशिया आणि युक्रेनच्या सैन्यामध्ये सर्वात मोठा स्टील प्लांट काबीज करण्यासाठी जोरदार युद्ध झाले. रशियन सैन्याच्या हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक प्लांट मारियुपोल येथे होता. हा प्लांट पूर्णपणे उद्ध्वस्त झाला असल्याचे सांगण्यात येत आहे.
रशियन बॉम्ब हल्ल्यात युरोपातील सर्वात मोठ्या लोह आणि पोलाद कारखान्यांपैकी एक असलेल्या अझोव्स्टलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. युक्रेनच्या खासदार लेस्या वासिलेंको यांनी हा प्लांट उद्ध्वस्त झाल्यानंतर एक ट्वीट केले आहे. त्यात त्यांनी, “युरोपमधील सर्वात मोठ्या स्टील प्लांटपैकी एक उद्ध्वस्त झाला. हा प्लांट उद्ध्वस्त होणं हे युक्रेनसाठी खूप मोठं आर्थिक नुकसान आहे. शिवाय यामुळे पर्यावरणाचेही मोठे नुकसान झाले आहे.” असे म्हटले आहे. या ट्विटसोबत वासिलेंको यांनी एका या प्लांटमध्ये झालेल्या भीषण स्फोटांचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ज्यामध्ये होणारे स्फोट आणि धूर स्पष्टपणे दिसत आहे.
#Mariupol #Azovstal One of the biggest metallurgic plants in #Europe destroyed. The economic losses for #Ukraine are huge. The environment is devastated #StopRussiaNOW pic.twitter.com/4GMbkYb0es
— Lesia Vasylenko (@lesiavasylenko) March 19, 2022
दरम्यान, युक्रेनवरील आक्रमण सुरू ठेवण्याची किंमत रशियाला ‘येत्या अनेक पिढय़ांपर्यंत’ मोजावी लागेल, असा इशारा युक्रेनच्या अध्यक्षांनी नुकताच दिला. आपल्या अडकून पडलेल्या सैनिकांच्या समर्थनासाठी रशियाने मोठा मेळावा आयोजित केल्यानंतर त्यांनी हे वक्तव्य केले. दरम्यान, रशिया युक्रेनमधील शहरांना शरणागती पत्करण्यास भाग पाडण्याचा प्रयत्न करत असल्याचेही युक्रेनच्या अध्यक्षांनी म्हटले आहे.