लोणी काळभोर -ग्रामपंचायत हद्दीतील पेट्रोल पंपावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या तीन अल्पवयीन मुलांसह नऊ जणांना पोलिसांनी कदमवाकवस्ती (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीत जेरबंद केले आहे. त्यांचा एक साथीदार पळून गेला आहे. त्यांच्याकडून घातक हत्यारांसह तीन दुचाकी असा एकूण 2 लाख 50 हजार 310 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सहाजणांना दोन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. याप्रकरणी कुणाल नारायण जाधव (वय 22, रा. काळेपडळ, हडपसर, पुणे), ऋषीकेश राजेंद्र बर्डे (वय 21, रा. संतोष नगर, कात्रज, पुणे), विकी धनंजय म्हस्के (वय 29) तेजस उर्फ भैया
धनंजय म्हस्के (वय 26, दोघे रा. इनामदार वस्ती, कोरेगाव मूळ ता. हवेली), केतन गौरव कोंढरे ( वय 19, रा. त्रिमुर्ती चौक, भारती विद्यापीठ, पुणे), पुर्वेश शशीकांत सपकाळे (वय 22, रा. भेकराईनगर, फुरसुंगी) यांना अटक करण्यात आली आहे.