सचिन केदारी
पौड – आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर इच्छुकांनी क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यती आदींच्या माध्यमातून मतांची पेरणी करण्यास सुरुवात केली आहे. मुळशीतील पंचायत समिती गण संख्या यापूर्वी 6 होती. आता नव्याने 2 गण वाढले आहेत. तर जिल्हा परिषदेचा एक गट वाढून एकूण 4 जागा मुळशीत निर्माण झाल्या आहेत. नव्याने होत असलेली गण आणि गट रचना विचारात घेता नवीन आराखड्यानुसार इच्छुकांनी उमेदवार कोणत्या गटात किंवा गणात निवडणूक लढणार याचा संभ्रम अवस्था निर्माण झाल्याची दिसत असले. तरी नवीन रचना विचारात घेता इच्छुकांनी क्रिकेट स्पर्धा, बैलगाडा शर्यत, इतर स्पर्धेचा जोरावर मतदारांपर्यंत पोहाचून त्यांना खूश करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे.
निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजकीय क्षेत्रात जोरदार शक्तिप्रदर्शन होत आहे. काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस आमदार संग्राम थोपटे यांचा दौऱ्यात विकासकामे उद्घाटन, नवीन पक्ष प्रवेश करण्यात आले. तसेच कॉंग्रेसच्या वतीने ऑनलाइन पद्धतीने डिजीटल सभासद नोंदणी करण्यात येत असून कॉंग्रेस यावेळेस जास्तीत जास्त जागा निवडून आणण्यासाठी जोरदार बांधणीकरताना दिसत आहे. नुकत्या झालेल्या पीएमआरडीए निवडणुकीत मुळशीत राष्ट्रवादीची जागा आली आहे.
तर पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या उपाध्यक्षपदावरही तालुक्याला संधी मिळाली आहे. साहजिकच राष्ट्रवादीमध्ये नवीन चैतन्य निर्माण झाल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा नुकताच झालेला सहकार मेळावा. यावेळी उपस्थित खासदार सुप्रिया सुळे यांचा मुळशी तालुक्यातील विविध कार्यक्रम, उद्घाटने करण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस नवीन कार्यकर्त्यांचा पक्ष प्रवेश झाले. त्यामुळे राष्ट्रवादीमध्ये इच्छुकांची संख्या वाढली आहे.
शिवसेनेनेही तालुक्यात कंबर कसली आहे. पुणे जिल्हा संपर्कप्रमुख सचिन अहिर यांचा दौरा मुळशी तालुक्यात झाला असून विकास कामाचे उद्घाटन करण्यात आले. शिवसेना आणि युवासेना यांच्या माध्यमातून शासन आपल्या दारी, ठाकरे सरकार घरोघरी एक हात मदतीचा, गाव तेथे युवासेना शाखा आणि घर तेथे युवासेना अशा वेगवेगळ्या उपक्रम राबविले आहेत. त्यामुळे शिवसेना युवासेना मार्फत जास्तीत जास्त ताकत लावताना दिसत आहे.
मुळशीत कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस, शिवसेना यांच्या वरिष्ठ नेत्यांच्या झालेल्या दौऱ्यामुळे भारतीय जनता पार्टी आपले पक्षातील कोथरूड आमदार चंद्रकांतदादा पाटील यांचाही दौरा होणार असल्याचे चर्चा सुरू आहे. मनसेचे इंजिन मुळशीत धावणार असल्याने सर्व जागा ताकतीने लढवणार का आणि आर. पी. आय पक्ष काय भूमिका घेणार हे सुधा महत्वाचे आहे. त्यांची मते कोणाचा पदरात पडतील यावर सुद्धा निवडणुकीचा निकालाचा कल दिसून येईल.
शिवसेनेची ताकद वाढणार
मुळशीत राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य यांचा शिवसेनेत प्रवेश झाल्याने शिवसेनेची ताकद वाढणार का? राष्ट्रवादीला आपल्या हक्काच्या मतांचा परिणाम होणार का नाही? याचा फायदा कॉंग्रेस, भाजपा, इतर पक्षाला होणार का? हे येणारी आगामी पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये स्पष्ट होईल.
कॉंग्रेसची पाटी कोरी
भोर, वेल्हा, मुळशी तालुक्यातून संग्राम थोपटे सलग तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले आहेत. तरीदेखील मुळशीतील पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुकीत एकही जागा गेल्या दोन पंचवार्षिक निवडणुकीत कॉंग्रेसची निवडून आल्या नाहीत. त्यामुळे यावेळेस मुळशीत कॉंग्रेसच्या किती जागा निवडून येतात हे महत्वाचे आहे.