मुंबई – बॉलीवूडमधील फ्रॅंट रनर आणि स्टाइल आयकॉन अभिनेत्री ‘दीपिका पदुकोण’ने लौकिकार्थाने आतापर्यंत बरेच यश कमावले आहे. आणि त्यामुळेच दीपिका बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. नुकताच दीपिका पदुकोणचा ‘गहराइयां’ हा नवीन सिनेमा प्रदर्शित झाला असून, यामध्ये अभिनेत्री अनन्या पांडे आणि अभिनेता सिद्धांत चतुर्वेदी हे सर्व लीड रोल मध्ये आहेत.
सध्या सोशल मीडियावर ‘गहराइयां’ सिनेमाचा चांगलाच बोलबाला दिसून येत आहे. फॅन्स सुद्धा या सिनेमाला तुफान प्रेम करत आहे. तर दीपिका सुद्धा आपल्या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. नुकतंच दीपिकाने एका मुलाखतीत आपला आवडता अभिनेता कोण? आणि मला कुणासोबत काम करण्याची इच्छा आहे? हे सांगितलं आहे.
यावेळी दीपिका म्हणाली की.., “मला दाक्षिणात्य अभिनेते प्रचंड आवडतात. पुष्पा फेम अभिनेता ‘अल्लू अर्जुन’ आणि ‘ज्युनियर एनटीआर’ हे दोन अभिनेते मला आवडतात. दीपिकाला या दोघांचा अभिनय प्रचंड आवडतो. तर तिने त्या दोघांसोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली आहे.
याशिवाय तिच्या आवडत्या दिग्दर्शका विषयीही दीपिकाने सांगितले आहे. दीपिकाने सांगितले की तिला अयान मुखर्जीसोबत काम करायला नक्की आवडेल. या आधी त्यांच्यासोबत दीपिकाने ‘ये जवानी है दीवानी’ काम केलं आहे. याशिवाय तिला एसएल राजामौली यांच्यासोबत काम करायची इच्छा व्यक्त केली. एका प्रसिद्ध वृत्तसंस्थेच्या मुलाखतीत दीपिका असं म्हणाली.