पुणे – ज्येष्ठ अभिनेते आणि चित्रपट दिग्दर्शक ‘अमोल पालेकर’ यांना पुण्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अमोल पालेकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले आहे. अमोल पालेकर यांना झालेल्या एका दीर्घ आजारवर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
दरम्यान, आता त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याची माहिती त्यांची पत्नी संध्या गोखले यांनी दिली आहे. अमोल पालेकर यांना अतिधुम्रपान केल्यामुळे त्रास झाला होता. त्यामुळेच 10 वर्षांपूर्वीही त्यांना याच आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
70 आणि 80 च्या दशकात अमोल पालेकर यांनी रजनीगंधा, छोटी सी बात, नरम गरम, गोलमाल, चितचोर, भूमिका, श्रीमान श्रीमती, अनकही, रंग-बिरंगी, घरोंदा, सावन, बातों बातों में यांसारख्या अनेक हिंदी सिनेमांत काम केले आहे. त्यांनी स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली असून, मराठीतील शांतता कोर्ट चालू आहे, या सिनेमांच्या माध्यमातून अमोल पालेकरांनी सिनेमाक्षेत्रात पर्दापण केलं.