हैदराबाद – उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू यांना करोनाची लागण झाली आहे. सध्या व्यंकय्या नायडू हे हैदराबादमध्ये आहेत. त्यांनी एक आठवडाभर घरातच विलगीकरणात राहण्याचा निर्णय घेतला आहे.
संपर्कात आलेल्यांनी करोनाची चाचणी करुन घेण्याचे आवाहनही नायडू यांनी केले आहे. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी ट्विट करत आपला करोनाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याचे सांगितले. तसेच संपर्कात आलेल्या सर्वांनी आठडाभर स्वत:ला विलगीकरणात ठेवावे, असेही त्यांनी सांगितले.