मुंबई – बिग बॉसची ओटीटीची स्पर्धक आणि टीव्ही अभिनेत्री उर्फी जावेद दररोज तिच्या कपड्यांबद्दल नेहमीच चर्चेत असते. कोणत्याही गोष्टीची तमा नबाळगता उर्फी स्वतःचे हॉट आणि बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. फॅन्स सुद्धा तिच्या बोल्ड लूकवर कमेंटचा वर्षाव करत असतात.
मात्र यावेळी उर्फी तिच्या मादक फोटोमुळे चर्चेत आली नसून सोशलवर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीतील व्हायरल फोटोमुळे चर्चेत आली आहे.
सोशलवर व्हायरल फोटोमध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या बैठकीत उर्फी सहभागी झाल्याचा दावा केला आहे. उर्फीला हा फोटो तिच्या चाहत्यानं पाठवलेला आहे. ज्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री बैठक घेताना दिसत आहेत. त्यांच्यासमोर सुरू असलेल्या टीव्ही त्याचवेळी उर्फीशी संबंधीत बातमी दाखवली जात आहे.
व्हायरल फोटोत उर्फीनं लिहिलं आहे की,‘योगीजींसोबत या बैठकीत सहभागी झाल्याचा आनंद आहे. हा व्हायरल फोटो मला एक फॅन ने सेंड केला असून हा फोटो मला पाठवला जो पाहिल्यानंतर मला खूप हसू आलं.’ अर्थात उर्फी खरंच मुख्यमंत्री योगीनाथ यांच्या बैठकीत सहभागी झाली नव्हती. पण हा फोटो मात्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
मूळची लखनऊची असलेली उर्फी जावेदनं २०१६ साली ‘बड़े भैया की दुल्हनिया’ या मालिकेतून आपल्या करिअरला सुरुवात केली होती. उर्फीच्या वर्क फ्रंटबाबत सांगायचे झाल्यास ‘सात फेरी की हेरा फेरी’, ‘बेपनाह’, ‘जीजी मां’, ‘डायन’, ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ आणि ‘कसौटी जिंदगी’ सारख्या टीव्ही शोमध्ये दिसली आहे. ती टीव्हीवर वेगवेगळ्या भूमिकांमध्ये दिसली आहे.