वाघोली,पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदी निवडून दिलेल्या सर्व मतदारांच्या तसेच शेतकऱ्यांच्या विश्वासाला पात्र राहून आगामी काळात बँकेच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवणार असल्याचे प्रतिपादन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित संचालक प्रदीपदादा कंद यांनी केले.
केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक पदी वर्णी लागल्याबद्दल विकास दांगट पाटील, प्रदीप कंद यांचा सत्कार करण्यात आला या सत्काराला उत्तर देताना कंद बोलत होते. केसनंद ग्रामपंचायतीच्या वतीने गावात होत असलेल्या विविध विकास कामांचे भूमिपूजन देखील मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.
यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रदीप कंद, भाजपचे नेते रोहिदास उंद्रे, प्रकाश जगताप, नितीन दांगट पाटील, प्रशांत काळभोर, माजी सरपंच मिलिंद हरगुडे,केसनंदचे सरपंच नितीन गावडे, उपसरपंच रूपाली हरगुडे, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद हरगुडे, दत्तात्रेय हरगुडे, विशाल हरगुडे,धनंजय हरगुडे, भारत हरगुडे, सुजाता गायकवाड, तंटामुक्त समितीचे माजी अध्यक्ष राजेंद्र सावंत प्रकाश जाधव, माजी सरपंच प्रणाली तांबे, संतोष हरगुडे, अनिल पासलकर, एसपी हरगुडे, अशोक गावडे, माजी उपसरपंच सचिन जाधव, कुबेर पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष रमेश हरगुडे पाटील, शंकर वाबळे, दिलीप हरगुडे, उमेश मोरे, संदीप ढोरे, अलकाताई सोनवणे, गणेश येवले, अनिल जाधव, शहाजी हरगुडे, बाबासाहेब हरगुडे, बाजीराव साळुंखे, नंदाराम चव्हाण, राहुल खैरे, अतुल हरगुडे, विपुल गायकवाड, संतोष गावडे, सुभाष बांगर, नारायण हरगुडे, सचिन हरगुडे, प्रसाद गावडे, राहुल हरगुडे आदी मान्यवर उपस्थित होते.