पुणे –महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) संयुक्त पूर्व परीक्षा आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षा या दोन्ही परीक्षेसाठी अर्ज भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. या परीक्षांसाठी अनुक्रमे 15 आणि 17 जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार आहेत.
एमपीएससीकडून अर्ज भरण्यासाठी महाराष्ट्र गट “क’ संयुक्त पूर्व परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी 11 जानेवारी आणि दिवाणी न्यायाधीश कनिष्ठस्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग पूर्व परीक्षाचा अर्ज भरण्यासाठी 15 जानेवारीची मुदत दिली होती. मात्र, आता अर्ज भरणे आणि चलनाद्वारे शुल्क भरण्यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे. या व्यतिरिक्त प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील अटी आणि शर्तींमध्ये बदल नसल्याचे एमपीएससीने स्पष्ट केले आहे. या बाबत अधिक माहिती एमपीएससीच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.