नवी दिल्ली – देशात आजही दीड लाखापेक्षा करोना रुग्णांची नोंद झाली आहे. करोनाच्या वाढत्या रुग्णंसंख्येमुळे सर्वांच्याच चिंतेतभर पडली आहे. गेल्या 24 तासात 1 लाख 68 हजार 63 नवीन करोना रुग्ण आढळले आहेत तर 277 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कालच्या तुलनेत आज करोनाच्या नवीन रुग्णांमध्ये 6.4 टक्के घट झाली आहे. सोमवारी 1 लाख 80 हजार नवे रुग्ण आढळले होते.
COVID-19 | India reports 1,68,063 fresh cases, 69,959 recoveries & 277 deaths in the last 24 hours
Active case tally reaches 8,21,446. Daily positivity rate (10.64%)
Omicron case tally at 4,461 pic.twitter.com/ikKRh2Xh6G
— ANI (@ANI) January 11, 2022
या दरम्यान 69 हजार 959 लोक करोनापासून बरे झाले आहेत. करोनाच्या नवीन रुग्णांबरोबर देशातील करोना बाधितांची एकूण संख्या 3 कोटी 58 लाख 75 हजार 790 झाली आहे. तर, या साथीच्या आजारामुळे आतापर्यंत 4 लाख 84 हजार 213 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 45 लाख 70 हजार 131 लोक करोनामधून बरे झाले आहेत. सक्रिय रुग्णांची संख्या आता 8 लाख 21 हजार 446 झाली आहे.