मुंबई – प्रसिद्ध चित्रपट निर्माता पराग सांघवी याच्या अडचणीत वाढ होताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी सक्तवसुली संचालनालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात पराग संघवीच्या अनेक ठिकाणांवर छापे टाकले होते आणि आता फसवणूक प्रकरणात त्याचे नाव पुढे आले आहे. पराग संघवी याला मुंबई पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्यात अटक केली असून आता त्याला २५ डिसेंबरपर्यंत कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
मुंबई पोलिसांच्या अधिकाऱ्यांनी अटकेची माहिती देताना सांगितले की, आर्थिक गुन्हे शाखेने चित्रपट निर्माते पराग सांघवीला फसवणुकीच्या प्रकरणात अटक केली असून त्याला 25 डिसेंबरपर्यंत आर्थिक गुन्हे शाखेच्या कोठडीत ठेवण्यात येणार आहे.
दरम्यान, सप्टेंबर महिन्यात अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) अधिकाऱ्यांनी परागच्या अनेक ठिकाणी छापे मारले होते. बँक डिफॉल्ट प्रकरणाशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात परागवर ही कारवाई करण्यात आली होती.
पराग सांघवी हा बॉलिवूड इंडस्ट्रीतील प्रसिद्ध चित्रपट निर्माता आहे. त्याने ‘सरकार’, ‘पार्टनर’ आणि ‘द अटॅक ऑफ 26/11’ या चित्रपटांची निर्मिती केली असून या चित्रपटांना प्रेक्षकांचे भरभरून प्रेम मिळाले आहे.