पुणे – स्त्री-पुरुष या दोन्ही घटकांद्वारे एकमेकांवर होणाऱ्या अन्यायाला आळा घालण्यासाठी आणि आरोपीच्या मनात कायद्याचा दरारा निर्माण होणे आवश्यक आहे. यासाठी हिवाळी अधिवेशनात शक्ती कायदा अंमलात आणण्यासाठी प्रयत्न करणार, असे आश्वासन विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.
डिजिटल टास्क फोर्स आणि ग्लोबल सायबर क्राइम हेल्पलाइनच्या वतीने “सायबर क्राइम हेल्पलाइन’ पुरस्कारांचे वितरण झाले. यावेळी रोहन न्यायाधीश लिखित “द बेलफूल बर्थ ऑफ बिटकॉइन’ या पुस्तकाचे प्रकाशन झाले. यावेळी फोर्सचे संस्थापक अध्यक्ष रोहन न्यायाधीश, शिवसेना शहर प्रमुख गजानन थरकुडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त राजेंद्र डहाळे, ऍड. नंदू फडके, पोलीस निरीक्षक संजय तुंगार आदी उपस्थित होते. “महिलांची सुरक्षितता आणि प्रतिबंधात्मक उपाय’ या विषयावर चर्चासत्र झाले. दरम्यान, मोबाइल हॅकिंग आणि सायबर क्षेत्रातील काही प्रात्यक्षिके दाखविण्यात आली.