सांगली – विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना स्कूल बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. स्कूल बस कॅनॉलमध्ये कोसळून अपघात झाला असून या अपघातात 11 विद्यार्थी जखमी झाले आहेत. सांगली जिल्ह्यातील आष्टा- मर्दवाडी रोडवर हा अपघात झाला आहे.
आष्टा येथे क्लेरमोंट शाळेच्या स्कूल बसला अपघात झाला असून यामध्ये 11 विद्यार्थी स्कूल बस चालक आणि सहाय्यक महिला देखील या अपघात जखमी झाले आहेत. हा अपघात काल रात्री 8 वाजता झाला आहे.
मिरज येथून टाटा मॅजिक कंपनीची स्कूल बस भरधाव वेगात जात असताना पुलाच्या संरक्षक दगडाला धक्का देत कॅनॉलमध्ये कोसळली. या अपघाताची माहिती मिळतात घटनास्थळी येथील शेतकऱ्यांनी धाव घेतली व जखमी विद्यार्थ्यांना कॅनॉलमधून बाहेर काढले. या विद्यार्थ्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी चालक ओंकार जयवंत घेवदे यांच्याविरुद्ध आष्टा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढित तपास पोलिस करत आहेत.