शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत तयार केला चांगला डास
जाकार्ता : जगाच्या पाठीवर सर्वच देशांना डास आणि डासांपासून येणाऱ्या रोगांबाबत चिंता वाटत आहे. त्यातही गेल्या काही कालावधीमध्ये डासांपासून होणाऱ्या डेंग्यू या रोगाची तीव्रता वाढल्याने या डासांवर कशा प्रकारे नियंत्रण ठेवायचे याबाबत विविध प्रकारचे उपाय केले जात आहेत.
आता इंडोनेशियातील शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत एक चांगला डास तयार केला असून हा डास डेंग्यू पसरवणाऱ्या डासांवर नियंत्रण ठेवण्याचे काम करणार आहे. प्रयोगशाळेत तयार झालेला हा चांगला डान्स डेंग्यूचा प्रसार करणाऱ्या डासांना नष्ट करण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार आहे. ऑस्ट्रेलियातील मोनाज युनिव्हर्सिटी आणि इंडोनेशियातील गडहाल युनिव्हर्सिटी यांच्या संयुक्त प्रयत्नातून हे प्रयोग करण्यात आहे येत आहेत.
या चांगल्या डासांच्या निर्मितीसाठी संशोधकांनी एका वेगळ्या प्रकारच्या प्रजातीच्या डासाचा वापर केला आहे. या जातीमध्ये वोलबचीय या नावाचा एक बॅक्टेरिया आढळतो जो डेंग्यूच्या विषाणू विरोधात काम करतो प्रयोगशाळेत या डासांची निर्मिती करण्यात आली असून त्याच्या माध्यमातून आता डेंग्यूच्या व्हायरस वर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे.
ज्या ठिकाणी डेंग्यूचा जास्त प्रसार झाला आहे त्या ठिकाणी हे डास सोडण्यात येणार असून त्यांचे याठिकाणी प्रजोत्पादन वाढवण्यावर भर देण्यात आला आहे. या चांगल्या डासांची संख्या वाढली की आपोआपच डेंग्यू पसरवणाऱ्या डासांची संख्या कमी होणार असून डेंग्यूवर नियंत्रण बसणार असल्याचा दावा या संशोधकांनी केला आहे. या डासांची जेव्हा चाचणी घेण्यात आली तेव्हा डेंग्यूचे प्रमाण 77 टक्क्याने कमी झाल्याचे आशादायक निष्कर्ष शास्त्रज्ञांना दिसले.