पुणे – इयत्ता दहावी, बारावी परीक्षेसाठी खासगीरित्या फॉर्म नंबर 17 भरून प्रविष्ठ होण्यासाठीच्या ऑनलाइन अर्जास महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने मुदतवाढ दिली आहे.
नियमित शुल्काने नावनोंदणी करून शुल्क ऑनलाइन भरण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 6 डिसेंबरदरम्यान सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थ्यांना मूळ अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी व शुल्क जमा केल्याबाबत व मूळ कागदपत्रे अर्जावर नमूद केलेल्या संपर्क शाळेत, कनिष्ठ महाविद्यालयात जमा करावे लागतात. यासाठीची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी 23 नोव्हेंबर ते 7 डिसेंबर असा कालावधी आहे. संपर्क केंद्र शाळा, कनिष्ठ महाविद्यायलांनी विद्यार्थ्यांचे अर्ज, ऑनलाइन नाव नोंदणी शुल्क जमा केल्याबाबत पोचपावतीची एक छायापत्र, मूळ कागदपत्रे व यादी विभागीय मंडळाकडे सादर करण्यासाठी 11 डिसेंबर या दिवस देण्यात आलेला आहे. प्राप्त अर्जातील दुरुस्त्या 11 ते 21 नोव्हेंबरदरम्यान करण्यात येणार आहे.