पणजी, दि. 23 – तृणमुल कॉंग्रेस गोव्याच्या राजकारणात हातपाय पसरत असून तेथे पक्षाची महुर्तमेढ रोवण्यासाठी पक्षाच्या नेत्या ममता बॅनर्जी 28 ऑक्टोबर रोजी राजकीय दौऱ्यावर जात आहेत. पक्षाने गोवा विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा या आधीच केली आहे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी अन्य राजकीय पक्षांनीही आमच्या बरोबर यावे असे आवाहन ममतांनी केले आहे. गोव्यातील जनता भाजपच्या दहा वर्षांच्या राजवटीला चांगलीच वैतागली आहे असेही त्यांनी म्हटले आहे. गोव्यात नवी सकाळ व्हावी यासाठी यासाठी आम्ही येथे प्रयत्नशील आहोत. गोवेकरांना आम्ही दिलासा देण्यासाठी तेथे येत आहोत असेही ममतांनी म्हटले आहे. आश्चर्यकाररित्या या पक्षाला तिथे चांगले समर्थन मिळताना दिसत असून अनेक प्रस्थापित नेत्यांनी त्या पक्षात प्रवेश करण्याचे काम सुरू केले आहे.