पुणे – करोना च्या महामारीमुळे रेसिंग इव्हेंट्स घेण्यावर अजूनही बंधने आहेत. त्यामुळे आर्म्स ने करोनाचे सर्व नियम पाळून “विंटेज अँड क्लासिक रिम्स बाय आर्म्स”ने (असोसिएशन ऑफ रेसिंग अँड मोटर्स स्पोर्ट्स, पुणे) हा २६० वा इव्हेंट घेण्याचे योजिले आहे. यामध्ये विंटेज दुचाकी गाड्यांचे प्रदर्शन केले जाणार आहे. “केंजळे बिझनेस कोर्पोरेट सेंटर, लाईट हाऊस जवळ, बिबवेवाडी-कोंढवा रोड, पुणे येथे गांधी जयंतीनिमित्त शनिवारी २ व रविवारी ३ ऑक्टोबर २०२१ रोजी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत हे प्रदर्शन भरविले जाणार आहे.
यामध्ये प्रसिद्ध विंटेज गाड्यांचे जतन करणारे रूबेन सॉलोमन, सॅम सॉलोमन, विनीत केंजळे, यांच्या गाड्यांचा सहभाग असून त्यांच्या बरोबर अनिल सहस्रबुद्धे, श्रीनिवास ठाकूर, शेखर सौदेकर, स्वीकार राठोड, राहुल मोकाशी, संदीप कटके, नितीन शुक्रे आणि पुण्यातील इतर संग्राहकांच्या गाड्यांचाही सहभाग आहे.
प्रदर्शनामध्ये अँटिक, विंटेज, प्री- वॉर, पोस्ट – वॉर, क्लासिक, रिसेन्ट क्लासिक व इंडियन क्लासिक या कॅटॅगरीमध्ये नावाजलेल्या नॉर्टन, व्हेलॉसिटी, ट्रायम्फ, बी. एस. ए., एरियल, रॉयल एनफिल्ड, जावा, जेझडी, राजदूत, यामाहा, वेस्पा, लाम्बरेट्टा यांसारख्या अनेक गाड्यांचा सहभाग असणार आहे असे आर्म्स चे प्रेसिडेंट श्री. कमलेश दवे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
या विंटेज गाड्यांच्या प्रदर्शनामध्ये जुन्या गाड्यांच्या स्क्रॅपेज पोलिसी बद्दलही जनजागृती केली जाणार आहे असे श्री विनीत केंजळे यांनी सांगितले. तर करोना च्या बंधनांमुळे बाईक्स फक्त प्रदर्शनासाठी असणार असून सार्वजनिक रस्त्यांवर कोणतीही राईड होणार नाही असे अससोसिएशनचे उपाध्यक्ष अरविंद पासलकर यांनी सांगितले. या वेळी पत्रकार परिषदेला अससोसिएशन चे खजिनदार शीतल राठोड व अससोसिएशन फॉर रेसिंग अँड मोटर स्पोर्ट्स, आग्रा चे अध्यक्ष राममोहन कपूर सुद्धा उपस्थित होते.
या प्रदर्शनामध्ये अजून कोणी विंटेज प्रेमींना त्यांच्या गाड्यांचा प्रदर्शनामध्ये सहभाग नोंदवायचा असल्यास ९८५०९१७११७ किंवा ९३२५२७४९८६ या नंबर वर संपर्क करून संधीचा उपयोग घेऊ शकतात.