पुणे विद्यापीठाचे बनावट मार्कलिस्ट तयार करणारी टाेळी ‘जेरबंद’

पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच इतर महाविद्यालयाचे नावाने दिल्या जाणाऱ्या पदवीच्या मार्कलिस्ट तसेच सर्टिफिकेट बनावटरित्या तयार करुन त्याची विक्री करणारी टाेळी पुणे ग्रामीण पाेलीसांचे स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली आहे. याप्रकरणी गणेश संपत जावळे , मनाेज धुमाळ (दाेघे रा.निरा,पुणे), वैभव लाेणकर (रा.बारामती,पुणे) या आराेपींना अटक करण्यात आली आहे.

पुणे विद्यापीठाचे नावाने बनावट मार्कलिस्ट करणारी टाेळी नीरा, बारामती परिसरात कार्यरत असल्याची माहिती पाेलीसांना मिळाली हाेती. सहाय्यक पाेलीस निरीक्षक संदिप येळे यांना मिळालेल्या गाेपनीय माहितीच्या आधारे पाेलीसांचे पथकाने नीरा याठिकाणी एका प्रिटिंग प्रेसवर छापा टाकला त्यावेळी पाेलीसांना पुणे विद्यापीठाचे लेटरहेडवरील बनावट मार्केलिस्ट व सर्टिफिकेट मिळून आले.

याप्रकरणी पाेलीसांनी तीन आराेपी अटक करुन त्यांचे विराेधात जेजुरी पाेलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाेलीस अधीक्षक डाॅ.अभिनव देशमुख, अप्पर पाेलीस अधीक्षक मिलिंद माेहीते यांचे मार्गदर्शनाखाली एलसीबीचे वरिष्ठ पाेलीस निरीक्षक अशाेक शेळके यांचे पथकाने सदर कारवाई केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.