वाघोली – पुणे शहर भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष तथा मांजरी खुर्द ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य स्वप्नील दत्तात्रय उंद्रे यांची मांजरी खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी बिनविरोध निवड झाली आहे. ग्रामपंचायतीचे तत्कालीन सरपंच महादेव रघुनाथ उंद्रे यांनी राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर निवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य स्वप्नील उंद्रे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांना निवडणूक निर्णय अधिकारी अशोक शिंदे यांनी बिनविरोध घोषित केले.
याप्रसंगी महाराष्ट्र राज्य भाजप कार्यकारणी सदस्य रोहिदास उंद्रे, पुणे जिल्हा अध्यक्ष गणेश भेगडे, पुणे शहर भाजप सरचिटणीस गणेश घोष, पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष दादासाहेब सातव पाटील, पुणे जिल्हा भाजप सरचिटणीस सुदर्शन चौधरी, पुणे शहर युवा मोर्चा अध्यक्ष राघवेंद्र बापू मानकर, करण मिसाळ, प्रतीक देसरडा, दीपक पवार, पिंटू शेठ हरपळे, माजी जिल्हा परिषद सदस्य विलास अण्णा काळभोर, पुणे जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रवीण काळभोर, रवींद्र कंद, सुहास खुटवड, अमोल शिवले, रवी वाळके, रमेश मदने, विक्रम गायकवाड,सागर हरपळे, माधुरी काळभोर, फुरसुंगीच्या माजी सरपंच उज्वला हरपळे, शिवा नाना उंद्रे, माऊली साळुंखे, रमेश उंद्रे, विलास उंद्रे, दत्तात्रय म्हस्के, बाळासाहेब भोसले, विकास उंद्रे, किशोर उंद्रे, प्रकाश सावंत दिलीप उंद्रे वसंत उंद्रे गौतम भोसले उपसरपंच वर्षा उंद्रे, सिताराम उंद्रे , निखिल उंद्रे, प्रतीक भोसले, प्रतिमा उंद्रे, कीर्ती उंद्रे, रेखा पवार, सीमा सावंत वैशाली काकडे, मनीषा डेरे, जयश्री हंकारे,आदी मान्यवर उपस्थित होते.
सन 2010 ते 2015 या कालावधीत स्वप्नील उंद्रे यांनी ग्रामपंचायत सदस्य पदाचा कार्यभार पूर्ण केला आहे.या शिवाय स्वप्नील उंद्रे यांचे पंजोबा सदाशिव गेनुजी उंद्रे ग्रामपंचायत स्थापनेनंतर गावचे पहिले सरपंच होते. 1963 नंतर या कुटुंबात स्वप्नील उंद्रे हे तरुण ग्रामपंचायत सरपंच बनले आहेत. आगामी काळात मांजरी खुर्द चा आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने बदल करून गाव नवीन विकासाच्या वाटेवर आणणार असल्याचे स्वप्नील उंद्रे यांनी सांगितले.