नवी दिल्ली : टॉलीवूड अभिनेता साई धरम तेज यांचा शुक्रवारी अपघात झाला. या अपघातात तो गंभीर जखमी झाले आहे. त्याच्यावर मेडिकओव्हर रुग्णालयात उपचार सुरु आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, साई धरम तेज त्यांच्या १८ लाखांच्या आणि तब्बल ११६० स्पोर्ट्स बाईकवर जात होते. यावेळी रस्तात त्यांची बाईक घसरली आणि ते गंभीर जखमी झाले.
त्यांचा हेल्थ रिपोर्ट डॉक्टरांनी शेअर केला असून यामध्ये लिहिण्यात आले आहे कि, ते धोक्याबाहेर आहे. पण त्याच्या डोळ्याजवळ, छातीवर आणि पोटावर जखम झाली आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
दरम्यान, या अपघाताचा व्हिडियो सोशलवर चांगलाच व्हायरल झाला आहे. त्यांचा अपघाताची माहिती कळताच अनेक टॉलीवूड सेलेब्स तात्काळ रुग्णालयात पोहोचले. अभिनेते चिरंजीवी यांच्यासोबतच पवन कल्याण, अल्लू अरविंद, नागाबाबू यांनी रुग्णालयात जाऊन साई तेज याच्या प्रकृतीची विचारपूस केली.