पणजी – गोव्यात गेल्या दोन दिवसांत दोन रशियन महिला मृतावस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यातील एक महिला 24 वर्षाची आहे. ती भाड्याने घेतलेल्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत गुरूवारी सापडली. तर तिची 34 वर्षीय मैत्रिण शुक्रवारी तिच्या अपार्टमेंट मध्ये मृतावस्थेत आढळली आहे.
सिओलिम गावात त्या दोघीही वेगवेगळ्या घरात रहात होत्या. त्यांच्या अंगावर अन्य कोणत्याही जखमा नाहीत. तथापि आम्ही सर्व बाजु लक्षात घेऊन तपास करीत आहोत असे पोलिसांनी सांगितले.
या दोघी एकमेकांच्या मैत्रिणी असल्याचे सांगितले गेले असले तरी पोलिस तपासात मात्र तसे काही आढळून आलेले नाही असे पोलिसांचे म्हणणे आहे. या दोघींच्या मृत्यू विषयी प्राथमिक तपासात तरी पोलिसांना कोणतेही धागेदारे मिळून आलेले नाहीत.