पठाणकोट – येथून जवळ असणाऱ्या मॅमून लष्करी तळावर उष्माघातामुळे एका जवानाचा मृत्यू झाला. तर अन्य चार जवानांची प्रकृती चिंताजनक आहे. तर अन्य 30 जवान या त्रासाने कोसळले असल्याचे वृत्त आहे.
लष्करी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, 9 कॉर्प रेकीट्रूपची सकाळी स्पर्धा घेण्यात आली. त्यावेळी वातावरण दमट आणि उष्ण होते. त्यामुळे 34 जवान कोसळले. त्यांना तातडीने पठाणकोट लष्करी रुग्णालययात दाखल करण्यता आले.
सहनशक्ती स्पर्धा आधीच 72 तास सुरू होती आणि पूर्ण भरलेली शस्त्रे घेऊन आणि 10 किमी पळण्याची स्पर्धा सकाळी 10 वाजता घेण्यात आली. त्यावेळी वातावरणात प्रचंड उकाडा होता. तसेच हवामान दमट होते, असे समजते.
याबाबत लष्कराशी संपर्क साधला असता एक अधिकाऱ्याने सांगितले की, सूत्रबद्धपण, देखरेखीखाली आणि लक्ष ठेवून पठाणकोटजवळ प्रशिक्षण सुरू होते. त्यावेळी अत्यंत प्रतिकूल वातावरणामुळे एकाचा मृत्यू झाला. तर काही जणांना पठाणकोट लष्करी रुग्णालयात दाखल करावे लागले. त्रास झालेल्या सर्व जणांना आवश्यक ती सर्व वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येत आहे.