रांची -अजय गिल नावाच्या महेंद्रसिंग धोनीच्या चाहत्याने थोडेथोडके नव्हे तर तब्बल 1400 किलोमीटरचे अंतर येता-जाता पार करत धोनीची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, धोनी रांचीत नसून चेन्नईत असल्यामुळे या चाहत्याचा भ्रमनिरास झाला.
View this post on Instagram
धोनीचे करोडो चाहते आहेत आणि त्याची भेट घेण्यासाठी काहीही करण्यास ते मागे राहात नाहीत. अनेकदा मैदानात सामना सुरू असताना पळत येऊन धोनीला आलिंगन देणारे, तर कधी पाया पडणारेही अनेक दिसतात.
View this post on Instagram
असाच एक अवलिया चाहता धोनीला भेटण्यासाठी थेट हरियाणावरून रांचीला पायी चालत पोहोचला. तब्बल येता-जाता 1400 किलोमीटरपेक्षाही जास्त अंतर पायी चालून अजय गिल रांचीला दाखल झाला. मात्र, धोनी चेन्नईत असल्याचे समजल्यावर त्याची निराशा झाली.
View this post on Instagram
अजय मूळचा हरियाणातील जलानखेडा गावचा रहिवाशी आहे. हातात तिरंगा आणि खांद्यावर क्रिकेट किट घेऊन अजयने 16 दिवसांत येता-जाता तब्बल 1 हजार 436 किलोमीटर अंतर पायी चालत पार केले.
View this post on Instagram
मात्र, इतका अट्टहास करूनही आपला स्टार भेटला नाही याची खंतही त्याने बोलून दाखवली. मात्र, निराश झालो असलो तरीही उमेद सोडलेली नाही. जेव्हा धोनी आयपीएल संपल्यावर मायदेशी परतेल तेव्हा पुन्हा त्याला भेटण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही अजयने सांगितले.