नवी दिल्ली – जागतिक बाजारात सोने आणि चांदीच्या दरात बुधवारी वाढ नोंदली गेली. त्यामुळे भारतीय बाजारात बुधवारी सोने आणि चांदीचे दर वाढले.
सोन्याचा दर 123 रुपयांनी वाढून 46,992 रुपये प्रति दहा ग्रॅम झाला. तयार चांदीचा दर 766 रुपयांनी वाढून 66,926 रुपये प्रति किलो या पातळीवर गेला.
एचडीएफसी सिक्युरिटीजचे विश्लेषक तपन पटेल यांनी सांगितले की डॉलर कमकुवत झाल्यामुळे सोन्याच्या दरात वाढ नोंदली गेली.