ज्ञानेश्वर फड
श्री मोतीराम महाराज दिंडी
श्री मोतीराम महाराज दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथामागे पंच्याहत्तर क्रमांकावर चालणारी दिंडी आहे. या दिंडीची सुरुवात 1982 मध्ये ह.भ.प. पंढरीनाथ महाराज भेंडेकर (गंगाखेड, परभणी) यांनी केली. ह.भ.प. महादेव मोटे हे वीणेकरी आहेत. या दिंडीत पाचशेहून अधिक वारकरी चालतात. त्यात प्रामुख्याने भेंडेवाडी, खादगाव, गंगाखेड, परभणी, लातूर, अहमतपूर, पुणे, मुंबई, जालना या भागातील वारकऱ्यांचा समावेश असतो. पंढरीनाथ महाराज भेंडेकर हे दिंडीप्रमुख आहेत. पंढरपूर पायी वारीसह संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्याला श्री क्षेत्र आळंदी येथे अखंड हरिनाम सप्ताह असतो. यावेळी सोहळ्याला आलेल्या भाविकांची राहण्याची, भोजनाची व्यवस्था दिंडीमार्फत केली जाते.
श्री मदन महाराज बिहाणी दिंडी
श्री मदन महाराज बिहाणी दिंडी ही संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात रथामागे एकोणएैशी क्रमांकावर चालणारी दिंडी आहे. या दिंडीची सुरुवात 1985च्या दरम्यान ह.भ.प. केशव महाराज गुट्टे (परळी वैजनाथ, बीड) यांनी केली. या दिंडीत पाचशेहून अधिक वारकरी चालतात. त्यात प्रामुख्याने परळी वैजनाथ, जिंतूर, कडा, आष्टी, अहमदनगर, जळगाव, बीड भागातील वारकऱ्यांचा समावेश असतो. सध्या ह.भ.प. तुकाराम महाराज गुट्टे दिंडीप्रमुखाची जबाबदारी सांभाळत आहेत. पंढरपूर पायी वारीसह संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन सोहळ्याला श्री क्षेत्र आळंदी येथे हरिनाम सप्ताह असतो. सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची दिंडीमार्फत राहण्याची, भोजनाची व्यवस्था करण्यात येते.
संत ज्ञानेश्वर महाराज आषाढी वारी पालखी सोहळा
पायी वारी असती तर… आजचा मुक्काम – नातेपुते