पुणे रेल्वे स्टेशन परिसरातील घटना
पुणे – रस्त्याने पायी चाललेल्या तरूणीला अडवून धक्का देत, त्यांना सत्तूराने मारहाण करून चोरट्यांनी हातातील १० हजारांचा मोबाईल हिसकावून नेला आहे. ही घटना काल मध्यरात्री एकच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन परिसरात घडली. याप्रकरणी अॅरोन राजू ढिलपे (वय २६, रा. येरवडा) यांनी बंडगार्डन पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.
फिर्यादी राजू काल मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास जेवण करण्यासाठी हॉटेलमध्ये गेले होते. मात्र, हॉटेल बंद असल्यामुळे ते रस्त्याने पायी माघारी चालले होते. त्यावेळी रिक्षातून आलेल्या टोळक्याने त्यांना अडवून धक्का दिला.
त्याचा विचारणा केली असता, टोळक्याने राजूला उलट्या सत्तूराने मारहाण करून हातातील १० हजारांचा मोबाईल हिसकावून नेला. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस तपास करीत आहेत.