न्यायालयाची फसवणूक; मित्राच्या जामिनासाठी बनावट कागदपत्रे बनविले

पुणे  (प्रतिनिधी)- मित्राला जामीन मिळविण्यासाठी न्यायालयात बनावट कागदपत्रे  सादर करून एकाने शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाची फसवणूक केली आहे. याप्रकरणी सचिन पांडुरंग रेवाळे  (रा. हडपसर) याच्याविरूद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली आहे.

कोंढव्यातील एका गुन्ह्यात आरोपी अफताब पठाण याला शिवाजीनगर जिल्हा न्यायालयाने ५० हजारांचा जामीन मंजूर केला होता. त्यासाठी आरोपी सचिन याने स्वतःच्या नावावर काहीही प्रॉपर्टी नसताना हडपसरमध्ये ७ गुंठे जमीन असल्याची बनावट कागदपत्रे  न्यायालयात सादर केली.

संबंधित कागदपत्रे वकिल पुरोहित यांच्यामार्पâत सादर करून न्यायालयाची फसवणूक करण्यात आली. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मुत्नाळे तपास करीत आहेत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.