शिल्पा शेट्टी आणि परेश रावल यांच्या आगामी “हंगामा-2′ चित्रपटाची खूप दिवसांपासून प्रतीक्षा आहे. हा चित्रपट 2003मध्ये प्रदर्शित झालेल्या प्रियदर्शन यांच्या “हंगामा’ चित्रपटाचा सिक्वल आहे.
या चित्रपटात मिजान जाफरी आणि प्रणिता सुभाषदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. करोना महामारीमुळे चित्रपटगृहे अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आली आहे. यामुळे हा चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे.
आता निर्मात्यांनी “हंगामा-2’चे नवीन पोस्टर रिलीज करत घोषणा केली की, हा चित्रपट 23 जुलै रोजी हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. तसेच चित्रपटाचा ट्रेलर 1 जुलै रोजी रिलीज होणार आहे.
या चित्रपटात शिल्पा शेट्टी आणि परेश रावल यांच्याशिवाय मीजान जाफरी, प्रणिता सुभाष, आशुतोष राणा, जॉनी लीवर मुख्य भूमिका साकारत अहे. या चित्रपटात अक्षय खन्नाने देखील कॅमियो रोल साकारला आहे. दरम्यान, “हंगामा-2’मधून शिल्पा शेट्टी चित्रपटांमध्ये कमबॅक करत आहे. तसेच साउथची अभिनेत्री प्रणीता सुभाषदेखील बॉलीवूडमध्ये डेब्यू करत आहे.