भारती विदयापीठ पोलीसांनी कामगिरी
पुणे : भारती विद्यापीठ पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे घरफोडी करणाऱ्या आरोपीस अटक केली आहे. त्याच्याकडून घरफोडीतील सहा हजाराचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
शब्बीर रुस्तम शेख (40, रा.चितामणी शाळेसमोर, आंबेगाव पठार , पुणे) असे अटक आरोपीचे नाव आहे. तो रिक्षा चालक म्हणून काम करतो. पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार दि.25/5/21 रोजी फिर्यादी मंगल सुनिल पवार (रा कात्रज ) यांचे रहाते घराच्या दरवाजा कुलुप लावूुन बंद असताना कोणीतरी अज्ञात चोरटयाने कुलुप तोडून घरातील 5,000 रुपये किमतीचे सोन्याची कर्णफुले व 50,000- रु रोख रक्कम असा एकूण 55,000 रुपयाचा ऐवज चोरुन नेला होता.
गुन्हयाचा तपास पोलीस उप निरीक्षक नितीन शिंदे हे करीत होते. आरोपीचा शोध घेत असताना सीसीटीव्हीच्या विश्लेषणाच्या आधारे अंमलदार रविंद्र चिप्पा व सचिन पवार यांना घरफोडी करणार हा चोरी केल्यावर रिक्षातुन गेला असल्याचे समजले. दरम्यान संबंधीत रिक्षा चालक हा रिक्षा घेवुन कात्रज ते नवले ब्रिज असा व्यवसाय करत असल्यची खबर मिळाली.
लागलीच त्याचा शोध घेत असताना रिक्षा नवले बिजकडुन कात्रज बाजुस येताना दिसली. रिक्षाचालक शेखला रिक्षा थांबण्याचा इशारा केला असता त्याने रिक्षा न थांबवता पुढे निघुन जावु लागला. मात्र त्याला अडवून कसून चौकशी केली असता, त्याने सदरची घरफोडी केल्याचे कबुल केले. त्याचेकडून गुन्हयात चोरीस गेलेले 6 हजार रुपये, कुलुप तोडण्यासाठी वापरलेला पान्हा व गुन्हा करताना वापरलेली रिक्षा जप्त करण्यात आली आहे.
ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगिता यादव, प्रकाश पासलकर यांचे मार्गदर्शनाखाली उप निरीक्षक नितीन शिंदे, अंमलदार रविन्द्र भोसले. रविंद्र चिप्पा, सर्फराज देशमुख, सचिन पवार, गणेश शेंडे,विक्रम सावंत, आशिष गायकवाड व सचिन गाडे यांनी केली आहे.