पुणे : पावसाळयापूर्वीची पहिल्या टप्प्यातील कामे उत्तमरित्या झाली असून उर्वरीत कामेही तातडीनं पूर्ण करावीत असे आदेश महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिले आहेत.
महापौर मोहोळ यांनी सोमवारी शहराच्या पूर्व भागातील पावसाळी तसेच मागील वर्षी अतिवृष्टीमुळे दक्षिण पुण्यात ज्या भागात पूर आला होता. त्या ठिकाणच्या कामांची पाहणी त्यानंतर पहिल्या चांगले काम झाल्याचे ते म्हणाले. तसेच ज्या भागात अद्यापही सीमाभिंत, नाल्याची स्वच्छता, काही ठिकाणी ही कामे बाकी आहेत, अशा ठिकाणची कामे त्वरित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
उपमहापौर सुनिता वाडेकर, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, आयुक्त विक्रम कुमार, अतिरिक्त आयुक्त कुणाल खेमणार आणि विविध खात्यांच्या प्रमुखांसह प्रभागनिहाय उपस्थिती नगसेवक धीरज घाटे, सरस्वती शेंडगे, सचिन दोडके, अल्पना वर्पे, हर्षाली माथवड, राजाभाऊ बराटे, वृषाली चौधरी सुशील मेंगडे, हरिदास चरवड, मंजुषा नागपुरे, ज्योती गोसावी, श्रीकांत जगताप, दत्ता धनकवडे, मनिषा कदम, राजेंद्र शिळीमकर, मानसी देशपांडे, धीरज घाटे, वसते, रघुनाथ गौडा, अजय खेडेकर, मनिषा लडकत, अर्चना पाटील, रफिक शेख, स्मिता वस्ते, सदानंद शेट्टी, आरती कोंढरे, विजयालक्ष्मी हरिहर या वेळी उपस्थित होते.
महापौर मोहोळ पुढे म्हणाले, ‘पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. याची खबरदारी घेऊन प्रशासनाला ताबडतोब उपाययोजना करून कामे मार्गी लावण्याची आदेश यावेळी दिले आहेत. यावेळी इस्माईल बेकरी, रमेश वांजळे चौक वारजे,सोनवणे हॉस्पिटल अरण्येश्वर, मित्र मंडळ चौक आंबील ओढा, जुना बाजार कसबा पेठ, रस्ता पेठ , कात्रज आदी ठिकाणी पाहणी दौरा केला.यावेळी त्या अगोदर झालेल्या कामाचादेखील आढाव घेतला आहे.
शहरातील अनेक ठिकाणच्या कामांना वेग आला असून लोकवस्तीच्य परिसरातून वाहणाऱ्या ओढ्या नाल्याची साफ करण्यात येत आहे./इस्माईल बेकरी नाला परिसरात प्रवाहास अडथळा ठरणाऱ्या अनावश्यक स्टॉर्म वॉटर लाइन्स तोडून काढण्यात आल्या.
वारजे येथील रमेश वांजळे चौकात रस्त्यावर पाणी साठून वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी हायवेवर जागोजागी स्लॅब काढून साफ करण्यात आले आहेत .तसेच नेहरू रस्त्यावर फर्निचर विक्रेते नाल्यात फर्निचर ठेवत असल्याने त्यांच्यावर पालिकेने कारवाई केली आहे. तसेच अरण्येश्वर परिसरातील पाण्याच्या प्रवाहाल अडथळा येत असलेली जलवाहिनी शिफ्ट करण्यात आली असल्याचे महापौरांनी स्पष्ट केले.