मेष : कामात प्रसंगावधान दाखवाल. बेकारांना नवीन संधी चालून येईल. महिलांना मनःस्वास्थ्य मिळेल.
वृषभ : आप्तेष्टांच्या सहवासात वेळ मजेत जाईल. तरुणांचे विवाह होतील. विद्यार्थ्यांना यशदायक ग्रहमान.
मिथुन : व्यवसायात व्यावहारिक दृष्टिकोन ठेवाल. फायदा मिळवून देणाऱ्या कामांना प्राधान्य द्याल.
कर्क : जुनी येणी वसुलीकडे लक्ष केंद्रित कराल. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील.
सिंह : नोकरीत महत्त्वाचे पत्रव्यवहार होतील. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाचा फायदा निर्णय घेताना होईल.
कन्या : नवीन हितसंबंध जोडले जातील. महिलांना गृहसौख्य प्राप्त होईल. शुभकार्यात वेळ चांगला जाईल.
तूळ : विद्यार्थ्यांना प्रगतिकारक. मिळालेल्या संधीचा जास्तीत जास्त उपयोग कराल. ग्रहांची साथ मिळेल.
वृश्चिक : व्यवसायात नवीन कामे दृष्टिक्षेपात येतील. अनपेक्षित लाभ होतील. आर्थिक स्थिती समाधानकारक राहील.
धनू : नोकरीत वरिष्ठ दिलेला शब्द पाळतील. कामामुळे तुमची पत व प्रतिष्ठा वाढेल. कामात कल्पकता दाखवाल.
मकर : महिलांनी आवडत्या छंदात मन रमवावे. नवीन कामाची संधी मिळेल. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील.
कुंभ : मानसिक आरोग्य उत्तम राहील. व्यवसायात वेळेचे व पैशाचे गणित अचूक आखलेत तरच फायदा होईल.
मीन : कामात सातत्य टिकवावे लागेल. परिस्थितीशी जमवून घेतलेत तर वेळ व शक्ती खर्च होणार नाही.