पुणे – लष्कर पोलीस ठाण्याचे परिसरात एकट्या रहाणाऱ्या वयोवृध्द व्यक्तींचे सर्वेक्षण केले. करोना व इतर कालावधीत त्यांना कोणती मदत लागली तर ती पोलिसांकडून पुरवली जाणार आहे.
तसेच पोलीस कर्मचारी कायदा-सुव्यवस्थेच्या दुष्टीने त्यांच्या घरी नियमीतपणे भेटली देतील कॅटोमेंन्ट पोलिसांच्या सर्वेक्षणात दोन वृद्ध जोडप्यांसह, 18 लोक वयोवृद्ध व्यक्ती कॅम्प आणि लगतच्या भागात एकटेच राहत असल्याचे आढळले.
मागील आठवड्यात कॅन्टोन्मेंट पोलिसांनी त्यांच्या हद्दीत हे सर्वेक्षण केले. करोणामुळे कुटूंबातील व्यक्ती गमावल्याने एकाकी पडलेल्या व्यक्तींची माहिती गेण्यात आली.
तसेच ज्यांच्या कुटूंबातील एकापेक्षा जास्त व्यक्तींचे निधन झाले आहे, अशा व्यक्तींचेही सर्वेक्षण करण्यात आले. नागरिकांचे डोअर टू डोअर सर्वेक्षण केले. एकाकी नागरिक किंवा वृद्ध जोडप्यांची यादी तयार केली जाणार आहे.
त्यांना कोणत्याही खाद्यपदार्थ आणि औषधे आवश्यक असल्यास पोलिस त्यांच्याशी सतत संपर्कात रहातील. कॅन्टोन्मेंट पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक कदम यांनी सांगितले की, आतापर्यंत आमच्याकडे दोन वृद्ध जोडप्यांसह 18 वृद्ध व्यक्ती एकटेच राहत असल्याची माहिती आली आहे.
कोविड इन्फेक्शनने नातेवाईक गमावल्यानंतर एक व्यक्तीला एकटाच रहाताना आढळला. हे सर्वेक्षण अद्याप सुरू आहे. शिबिराच्या व आसपासच्या भागात डोअर टू डोर सर्वेक्षण करण्यासाठी पोलिसांनी एसपीओंचा मोठ्या प्रमाणात वापर केला.