पुणे – औंध गावात साडे आठ वाजण्याच्या सुमारास बंगल्यात घुसून 3 चोरट्यानी जेष्ठ दाम्पत्याला व त्यांच्या कुकला चाकूचा धाक दाखवून 16 लाख रुपयांची जबरी चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कुकसह या दाम्पत्याल बाथरूममध्ये कोंडून चोरटे पसार झाले. दांम्पत्याने मुंबईत असलेल्या मुलाला मेसेज केल्यावर शेजारच्यांनी त्यांची सुटका केली.
याप्रकरणी 73 वर्षीय जेष्ठ महिलेने चतुःश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जेष्ठ दाम्पत्य साधू वासवानी नगर येथे सिंध सोसायटीत रहाते त्यांचा स्वतः बंगला आहे. ते दोघेच राहतात. त्यांचा कन्स्ट्रक्शनचा व्यवसाय होता. सध्या तोही त्यांनी करणे बंद केला आहे. मूलगा व मुलगी विवाहानंतर मुंबईत रहातात. ते दोघेच येथे राहतात. त्यांच्याकडे असलेला कुक हा 1988 पासून आहे.
दरम्यान रविवारी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास तिघेजण त्यांच्या बंगल्यात शिरले. त्यावेळी कुक काम करत होता. तर जेष्ठ दाम्पत्य वरच्या मजल्यावर बसले होते चोरट्यानी कुक ला चाकूचा धाक दाखवला. तसेच कुकला हाताने मारहाण केली.
त्यानंतर त्यांना धमकावत चोरटे बेडमरूममध्ये शिरले. त्यांनी कपाटातून 70 हजाराची रोकड, यु.एस डॉलर आणि इतर असा 15 लाख 80 हजार रुपयांचा ऐवज चोरला. त्यानंतर चोरट्यांनी तिघांना बाथरूममध्ये कोंडून पळ काढला. .