मेरी जंग या चित्रपटातील खलनायकापासून ते टीव्हीवरच्या रिऍलिटी शोच्या जजपर्यंत जावेद जाफरीचा प्रवास झाला आहे. जावेद जाफरी हे मोठे नाव आहे आणि उत्तम डान्सर म्हणूनही त्यांनी त्याकाळी लक्ष वेधून घेतले होते. त्याला दोन मुले व एक मुलगी आहे.
View this post on Instagram
त्यातल्या मोठ्या मुलाने अर्थात मी झाननने अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले आहे तर दुसरा मुलगा अब्बास अजून बराच लहान आहे. मात्र त्याची मुलगी अलविया सोशल मीडियावर आपले वर्चस्व निर्माण करण्यात यशस्वी ठरली आहे व तिच्या बहुतेक मैत्रिणी अर्थातच स्टार किड आहेत.
View this post on Instagram
यातील काहींनी चित्रपटांत पदार्पण केले आहे तर काही त्या वाटेवर आहेत. त्यामुळे अलवियाकडेही आता सगळ्यांच्या नजरा लागल्या आहेत. तिने अमेरिकेत उच्चशिक्षण घेतले असल्याचे सांगितले जाते.
View this post on Instagram
मात्र अभिनयात कारकीर्द करण्याबाबत विचारल्यावर आपण अद्याप त्याचा विचारच केला नसल्याचे तिने एका मुलाखतीत सांगितले. तसेच आपण वडील अगदी शिस्तप्रिय आहेत व त्यांना आम्ही घाबरतो. मी या क्षेत्रात यावे असे त्यांना वाटत नसल्याचेही तिने म्हटले आहे.