मुंबई – यंदाच्या मोसमात ऑरेंज कॅप असणाऱ्या धवनने सलामी फलंदाज म्हणून 5000 धावांचा टप्पा ओलांडला आहे. आयपीएलच्या इतिहासात अशी कामगिरी करणारा तो पहिला फलंदाज आहे. 160 व्या डावात धवनने ही कामगिरी केली.
शिखर धवन आयपीएलमध्ये मुंबई, हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली कॅपिटल्स अशा चार संघांकडून खेळला आहे. हैदराबादचा डेव्हिड वॉर्नर या विक्रमात दुसऱ्या स्थानी आहे. त्याच्या खात्यात 124 डावात 4692 धावा आहेत. तिसऱ्या स्थानी पंजाबचा फलंदाज ख्रिस गेल आहे. त्याने 122 सामन्यात 4480 धावा केल्या आहेत.