आयुर्वेदामध्ये मनुक्याला सर्दी-पडसे, खोकला आणि कफ दूर करण्याचे सर्वात चांगले औषध मानले जाते. मनुके ही थंड असतात. यामुळे उन्हाळ्यात हे खाण्याचा सल्ला दिला जातो. आज आम्ही तुम्हाला सांगत आहोत उन्हाळ्यात मनुके खाण्याचे १० फायदे..
मनुक्याचे प्रमाण व्यक्तीचे वजन, वय आणि आजारानुसार कमी किंवा जास्त होऊ शकते. सामान्य व्यक्तीने दिवसातून पाच मनुके खावीत. मनुके तशीच खाऊ शकता. तुम्ही ही रात्री पाण्यात भिजवून सकाळी खाऊ शकता. दुधात उकळून घेऊन खा किंवा मधासोबत मिक्स करून खाणे फायदेशीर आहे. यामध्ये आयर्न असते. अॅनिमिया दूर करते. मनुक्यामध्ये फायबर्स असतात. ज्यामुळे पचनशक्ती वाढते.
वर्षातील कोणत्याही ऋतूमध्ये सुकामेवा खाणे फायद्याचेच ठरते. मात्र, हिवाळ्यात सुकामेवा शरीरातील ऊब टिकवण्यासाठी फायद्याचा ठरतो. त्यातही खासकरून मनुका हिवाळ्यात खाणे अधिक फायद्याचे असते. मनुक्यामधील लोह, पोटॅशियम आणि तंतू (फायबर) रक्तदाब कमी करून पचन व्यवस्थित ठेवण्यासाठी मदत करतात. मनुका ही मधुर, शीतल, हृदयासाठी हितकारक, श्रमनाशक, रक्तवर्धक असतात. याशिवाय मनुकांचे सेवन केल्याने शरीराला बरेच फायदे होतात. जाणून घेऊयात मनुकांचे सेवन कशापद्धतीने केल्यावर कोणते फायदे होतात.
मनुकांमध्ये लोहाचे प्रमाण जास्त असल्याने रक्तासंदर्भातील आजारांवर मनुका गुणकारी ठरतात. रात्री पाण्यात भिजत ठेवलेली मनुका सकाळी खाल्यास रक्ताच्या कमतरता संदर्भातील अॅनिमिया आजार काही प्रमाणात कमी होण्यास मदत होते.
मनुकांमध्ये पोटॅशियम मोठय़ा प्रमाणात असते. रोज एक चमचा मनुके लसणाच्या पाकळीसोबत खाल्ल्यास रक्तदाबावर नियंत्रण ठेवण्यास मदत मिळते. मनुकांमधील अँटिऑक्सिडेंट शरीरातील पेशीसांठी घातक असणा-या फ्री रॅडिकल्सचे प्रमाण कमी करतात. यामुळे कॅन्सरपासून बचाव होतो.
झोपण्याच्या एक तास आधी उकळलेल्या दुधामधून मनुकांचे सेवन केल्यास पोटाशी संबंधित आजारांवर मात मिळवता येते. खासकरून बद्धकोष्टावर हा उपाय करून पाहिल्यास नक्कीच फायदा होतो. यामुळे पचनक्रियाही सुधारते. मनुकांमधील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करण्याची क्षमता असते. त्यामुळेच ताप आल्यावर मनुके खावीत. ताप लवकर उतरण्यासाठी मनुकांचे सेवन करणे फायद्याचे ठरते.
मनुकांमध्ये बोरॉन नावाचा रासायनिक घटक असतो, जो सांधेदुखीच्या त्रासापासून मुक्ती देण्यासाठी उपयुक्त ठरतो. डोळ्यांच्या आरोग्यासाठी बिटा कॅरोटीन फायद्याचे ठरते. मनुकांमध्ये बिटा कॅरोटीन ब-याच मोठय़ा प्रमाणात असते. त्यामुळे नजर सुधारण्यासाठी डोळ्यांच्या आरोग्यासाठी मनुकांचे सेवन करावे.
दिवसातून दोन वेळा मनुकांचे व्यवस्थित चावून सेवन केल्यास ते गळ्यासाठी फायद्याचे असते. मनुका शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण मर्यादित ठेवण्यास मदत करतात. ज्यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.