अहमदाबाद – सलामीवीर जेसन रॉयच्या सर्वाधिक 46 धावांच्या जोरावर इंग्लंडने दुसऱ्या टी-20 सामन्यात भारतीय संघासमोर विजयासाठी 165 धावांचे आव्हान ठेवले आहे. इंग्लंडने निर्धारित 20 ओव्हरमध्ये 6 विकेट्स गमावून 164 धावा केल्या.
इंग्लंडकडून कर्णधार इयॉन मॉर्गनने 28, बेन स्टोक्सने 24, डेव्हीड मलानने 24 आणि जॉनी बेयरस्टोने 20 धावा केल्या. यष्टीरक्षक जोस बटलर शून्यावर बाद झाला.
भारताकडून गोलंदाजीत शार्दुल ठाकूर आणि वाॅश्गिंटन सुंदरने प्रत्येकी 2 विकेट्स घेतल्या. शार्दुलने 4 षटकांत 29 तर सुंदरनेही 4 षटकांत 29 धावा दिल्या. याव्यतिरिक्त भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी 1 विकेट्स घेतली.